हार स्वीकार करण्याची हिंमत
हल्लीच्या प्रतिस्पर्धेच्या काळात पालक मुलांना जिंकण्याची, सर्वांना मागे टाकून पुढे वाढण्यासाठी प्रेरित करत असतात. परंतू अनेकदा असे प्रयत्न नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. सर्वगुण संपन्न होण्याच्या भानगडीत मुलं ताण घेतात आणि अनेकदा लहानसे अपयश देखील सहन करू पात नाही. संघर्ष करण्याऐवजी ते पूर्णपणे हरल्याचा अनुभव करतात. त्यामुळे हार स्वीकार करून त्यातून शिकून पुढे वाढण्याची शिकवणूक द्यावी.
हॉबी
यशस्वी होण्याच्या नादात मुलांमधील रचनात्मकता संपते. हॉबी कुठलीही असू शकते जसे खेळ, पेंटिंग, गार्डनिंग, वाचन, लेखन... हे करण्याची सूट मुलांना दिलीच पाहिजे याने त्यांना दिवसातून काही वेळच का नसो स्वत:साठी जगण्याची जाणीव होते.
विविधतेचा सन्मान
घरातील वातावरण मुलांच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यांच्यासाठी धर्म, संस्कृती, जात, श्रीमंत-गरीब या असमानता महत्त्वाच्या नसतात. अशात त्यांचं संगोपन करताना याबद्दल सन्मान करण्याची शिकवण त्यांना जग सुंदर बनवण्यासाठी प्रेरित करू शकते.
निसर्गावर प्रेम
निसर्गावर प्रेम करणे शिकवल्यावर निश्चितच येणार्या पिढीला हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिग सारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रेरित करेल. त्यांना वृक्षारोपण करणे, निसर्गाची काळजी घेणे याबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.