आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या तणावामुळे वेढलेला आहे. आजच्या काळात लहान मुलं देखील तणावाखाली जात आहेत. बऱ्याच वेळा मुलांना तणाव त्यांच्या पालकांमुळे होतो. या मध्ये त्यांचे करिअर आणि अभ्यासाशी निगडित गोष्टींचा समावेश आहे. बऱ्याच कमी वयात मुलांना तणाव असणे चांगले नाही. मुलांना तणाव असल्यास हे करणे टाळावे.
* मुलांना अभ्यासाचा ताण देऊ नका-आजच्या काळात मुलांवर सर्वात जास्त ताण आहे ,तो आहे अभ्यासाचा. काही पालक आपल्या मुलांवर अभ्यासाचा ताण देतात. मुलांना शिकवणे चांगले आहे. परंतु त्यांच्या वर अभ्यासाचा ताण देणं चुकीचे आहे. मुलांना अभ्यासासाठी रागावू नका. त्यांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगा. असं केल्याने तो चांगल्या प्रकारे अभ्यास करेल.
* आवडीचे काम करू द्या- बऱ्याच वेळा असे आढळते की काही मुलांची गोडी अभ्यासात नसून इतर क्षेत्रात असते. ज्याच्या मुळे त्यांना भविष्यात फायदा होऊ शकतो. आपल्या मुलाला देखील नृत्य, संगीताची किंवा साहित्याची आवड असल्यास त्याच्या आवडीला वाव द्या. त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे वाढू द्या.