आपल्याकडून नकळत चुका झाल्या असल्यास अशा प्रकारे माफी मागा

बुधवार, 31 मार्च 2021 (08:15 IST)
नात्यात रुसवे फुगवे होतातच, नात्यात प्रेम व्यक्त करणे, एक मेकांची काळजी घेणं तेवढेच आवश्यक आहे जेवढे आवश्यक आहे घडलेल्या चुकांची कबूली करून माफी मागणे. आपल्याकडून देखील अशा कळत नकळत चुक्या झाल्या असल्यास आणि आपले जोडीदार रागावले असल्यास अशा पद्धतीने माफी मागू शकता.  जेणे करून आपल्या जोडीदाराचा राग कमी होईल. चला तर मग जाणून घ्या. 
 
 * खास संदेश लिहून - आपल्या कडून काही चुका झाल्या असल्यास आपण त्यांच्यासाठी काही खास संदेश लिहू शकता. आपण हे खास संदेश लिहून डायनिंग टेबल,स्नानगृह, कपाटात, टेबलावर, ठेवू शकता. जेणे करून ते वाचून आपल्या जोडीदाराचा राग शांत होईल.  
 
* एखादे सरप्राइज देऊ शकता- आपण आपल्या जोडीदारासाठी काही सरप्राइज देखील देऊ शकता.आपण जेवण्यात त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवू शकता. किंवा त्याला काही भेटवस्तू देऊ शकता. असं केल्याने जोडीदाराचा राग दूर होईल. 
 
* कविता लिहून किंवा आवडीचे गाणं म्हणून -जर आपल्याला कविता लिहिण्याची आवड आहे तर आपण आपल्या जोडीदारासाठी कविता लिहू शकता किंवा त्यांच्या आवडीचे गाणं म्हणू शकता. कविता लिहून किंवा गाण्यात आपण त्यांच्याशी माफी मागू शकता. 
 
* सहल किंवा ट्रिप चे आयोजन करा-आपण जोडीदारासह एखादी सहल देखील आयोजित करू शकता. असं केल्याने त्यांची नाराजगी दूर होईल .
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती