काय सांगता, शेविंग क्रीम स्वच्छतेचा कामी येऊ शकते

शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:30 IST)
घरात असलेली शेविंग क्रीम देखील स्वच्छता करण्यासाठी कामी येऊ शकते. कसे काय जाणून घ्या. 
 
* फर्निचर स्वच्छ करण्यासाठी -जर आपल्या घरात चामडी फर्निचर आहे तर या वरील तेलाचे डाग काढण्यासाठी या ठिकाणी शेविंग क्रीम लावा आणि 30 मिनिट तसेच ठेवा. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या तेलाचे डाग निघतील.
 
* चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी - चांदीचे दागिने ठेवल्या-ठेवल्या काळे पडतात. चमक परत आणण्यासाठी चांदीच्या दागिन्यांवर शेविंग क्रीम लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवून घ्या. चमक परत येते. दागिने कोरडे करून आपण पेपर नेपकीन मध्ये गुंडाळून ठेऊ शकता.
 
* काचेची स्वच्छता - घरातील सर्व काच आरशे स्वच्छ करण्यासाठी शेविंग क्रीम लावून कपड्याने पुसून घ्या. या वरील डाग नाहीसे होतील. 
 
* नेलं पेंट रिमूव्हर म्हणून वापर- नेलं पेंट रिमूव्हवर संपले असल्यास शेविंग क्रीम रिमूव्हवर म्हणून वापरू शकता. या साठी हे क्रीम नखांना लावून 10 मिनिटे तसेच ठेवा. नंतर कपड्याने पुसून घ्या. नेलं पेंट स्वच्छ होईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती