ब्लॉटिंगचा त्रास असल्यास हे करा...

बुधवार, 15 एप्रिल 2020 (20:27 IST)
ब्लाटिंग म्हणजे पोट फुगणे. काही वेळेस ऍसिडिटीने पण पोट फुगत असते. काही गरिष्ठ खाण्यात आल्यानेही हा त्रास होतो. पण आज आपण या लेखात मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या ब्लॉटिंग बद्दल जाणून घेऊ या. तसेच त्यावरील उपाय देखील जाणून घेऊ या. मासिकपाळीच्या काळात ऍसिडिटीमुळे पोटात दुखते पोट फुगण्याचा त्रास देखील होतो. त्या साठीचे काही उपाय केल्यास त्या त्रासाला पासून आणि वेदना पासून मुक्ती मिळते. 
 
* चमचमीत मसालेयुक्त पदार्थांचा वापर टाळावा यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो.
* पचन तंत्र मध्ये बिघाड होतो, त्यासाठी आपले पचन तंत्र सुरळीत करण्यासाठी आलं आणि लिंबाच्या चहाचे सेवन करावे.
* गवती चहा घ्यावा ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
* पाणी तर सर्व गोष्टींवर रामबाण उपाय आहे. जास्त पाणी पिणे उत्तम स्वास्थ्य असण्याची लक्षण आहे. पाण्यामुळेच सर्व आजार नाहीसे होतात. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे पाणी पिणे फायदेशीर असतं.
* या काळात आपल्या शरीरास पौष्टिक तत्त्व पाहिजे असतात. केल्शियम आणि मॅग्नेशियम आहारयुक्त पदार्थांचं समावेश करणं फायदेशीर ठरतं. केळ आणि दुधात केल्शियम असतं. त्याचा सेवन करावा.
* या काळात अश्या वस्तू ज्या गॅस वाढवतात आणि पोट फुगवतात ते खाणे टाळावे. सकस आहार घ्यावा. ब्रोकोली, कोबी, फ्लॉवरची भाजी खाऊ नये. त्यामुळे गॅसेस पण होते आणि ऍसिडिटीचा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असते.
* आलं शरीरातील सूज कमी करण्यास फायदेशीर असतं. ह्या मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी स्पॅस्मोडिक चे गुणधर्म असतात. शरीरातील वेदना दूर करण्याचे काम करतं.
* काही वेळा काही जण ऍसिडिटी आहे म्हणून शीतपेयाचे सेवन करतात. असे केल्याने ब्लॉटिंगचा त्रास अजून वाढतो. त्यासाठी कोल्ड ड्रिंक अजिबात घेऊ नका.
* चहा जास्त घेऊ नका कारण ऍसिडिटी वाढण्यासाठी हे कारणीभूत आहे.
* व्यायाम आणि योगा करा. पण थकवा जाणवेल असे काही करू नका. 
* पपई ही पचनतंत्र सुरळीत करण्याचे कार्य करते. ह्यामधले असलेले पपॅन एंझाइम पचन संस्थेला सुरळीत ठेवण्याचे काम करते. पपई खाल्ल्याने ऍसिडिटी, गॅस, ब्लॉटिंगच्या त्रासापासून सुटका होते. 
* मदिरा सारखे अल्कोहोल घेत असल्यास त्वरित घेणे बंद करावे. ह्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होण्याऐवजी जास्त वाढतो.
* मासिक पाळी मध्ये शतावरी घ्यावी. यामध्ये असलेले प्रोबायोटिकचे गुणधर्म पचन क्रिया सुधारतात आणि ऍसिडिटीचा त्रास कमी करतात. ब्लॉटिंग साठी सुद्धा फायदेशीर असतं.
* पुरेशी विश्रांती घ्यावी. झोप पुरेशी न झाल्याने सुद्धा ऍसिडिटीचा त्रास होतो आणि ब्लॉटिंगचा त्रास उद्भवतो.
 
जास्त त्रास होत असल्यास डॉक्टर कडून उचित परामर्श घ्यावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती