सजावटीचेही बजेट आखावे

बुधवार, 30 जुलै 2014 (15:06 IST)
घराची सजावट हा प्रत्येकाच्याच हौसेचा भाग असतो. पण सजावट अथवा घराचे नूतनीकरण करताना नियोजन गरजेचं आहे. अन्यथा काम बजेटबाहेर जाऊन विनाकारण मन:स्ताप संभवतो. सुरुवातीला आवश्यक ते बदल लिखित स्वरूपात मांडावेत आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंचे आणि उपकरणांचे बाजारभाव तपासावेत. यामुळे नेमका खर्च काढणं शक्य होईल. टाईल्स आणि फॅब्रिक या दोन गोष्टींसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे पहिल्यांदा याची खरेदी करा. त्याचबरोबर रंगाची शेडही निवडा. यामुळे या दोन्हींमधील सुसंगतता राखता येईल. 
 
मिक्स अँण्ड मॅच हीदेखील सध्याची स्टाईल आहे. मोठय़ा डिझाइनबरोबर हलकं डिझाइन, मोठय़ा चेक्सबरोबर छोटे चेक्स, प्लेन कापडाबरोबर स्ट्राईप्स असलेलं कापड आदी मार्गानं वैविध्य आणता येतं. घरातील कोपर्‍यांमध्ये आणि रिकाम्या जागेमध्ये इनडोअर प्लांटसाठी जागा ठेवा. सजावटातील हा महत्त्वाचा भाग ठरतो. नवे आणि धाडसी प्रयोग करण्याआधी टेस्ट घ्या. यामुळे नुकसानीची शक्यता कमी होते.

वेबदुनिया वर वाचा