वॉशिंग मशीनची काळजी घ्या

प्रत्येक घरातील अत्यंत सोयीचे उपकरण आहे वॉशिंग मशीन. मशीन आपला वेळ आणि मेहनत वाचवते म्हणून आपणही तिची थोडीशी काळजी घेतली तर मशीन वर्षोंनुवर्ष सर्व्हिस देत राहील.

* वॉशिंग मशीनबाबत काही माहीत नसल्यास त्यासोबत आलेल्या सूचना वाचा आणि त्याप्रमाणेच वापर करा.



सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे धुऊन झाल्यावर घाण पाणी लगेच ड्रेन करा. खूप वेळ पाणी मशीनमध्ये राहील्यावर त्यातून दुर्गंध येते.

कपडे धुऊन झाल्यावर मशीनचे झाकण उघडे ठेवा. याने मशीन पूर्णपणे कोरडी होते आणि त्यातून दमट वास येत नाही.
 

* मशीनचा टेबलासारखा उपयोग करू नये.
 
* मशीनच्या कंट्रोल पॅनलपासून कोणत्याही प्रकाराचे लिक्विड दूर ठेवा.



 
* स्टेन रिमूव्हरमुळे मशीनची फिनिशिंग खराब होते म्हणून शक्यतो हे मशीनमध्ये टाकणे टाळा.

* ड्रायर वापरताना त्यावर ड्रायर कॅप ठेवायला विसरू नका.

प्रत्येक 10 ते 15 दिवसाने वॉशिंग मशीन आतून आणि बाहेरहून स्वच्छ करा.



मशीनमधून कपडे स्वच्छ निघत नसतील किंवा त्यातून दुर्गंध येत असेल तर मशीन स्वत: किंवा मेकॅनिककडून आतपर्यंत स्वच्छ करून घ्यावी.

वेबदुनिया वर वाचा