झटपट पळवा भूक

मुलांची दुपारच्या वेळची भूक कशी भागवायची अशा यक्षप्रश्न समस्त मातांपुढे उभा असतो. अशावेळी झटपट पदार्थ तयार करणे विशेष आव्हानाचे ठरते. म्हणूनच सादर आहे झटपट तयार करता येणारे आणि भूक भागवणारे काही खास पर्याय:
 
* अंडं किंवा पनीर बुर्जी झटपट तयार होते. याला ब्रेड किंवा पोळीबरोबर लगेच खायला देता येईल.


* रोटी फ्रँकी हा पर्याय मस्त ठरेल. पोळीमध्ये शिजवलेली भाजी घालून त्यावर भरपूर चीज पसरवा. आता या पोळीचा रोल करून बटर टाकून भाजा. लगेच तयार होते टेस्टी आणि कुरकुरीत रोटी फ्रँकी.


* दाल खिचडी हा ही झटपट बनणारा चविष्ट पदार्थ आहे. थोडीशी हळद, मीठ आणि एखादं मिरची घालून तुपात शिजवलेली खिचडी मुलांसाठी पौष्टिकही ठरेल.




मधल्या वेळची भूक भागवण्यासाठी दाल सूप हा देखील झकास पर्याय आहे. प्रेशर कूकरमध्ये आवडीची डाळ शिजवा़, त्यात थोडंसं बटर, काळी मिरी पावडर आणि आवडत्या भाज्यांचे तुकडे घाला.


* रव्याचे पदार्थ झटपट तयार होतात. रवा डोसा, रवा उत्तपा, इडली किंवा आवडीच्या भाज्या घालून रवा पिझ्झा झटपट तयार होतो.


* बटाटेच्या चिप्स, वेगवेळ्या प्रकाराचे पापड, मक्याच्या पापड्या, फ्रायम्स व इतर असे काही पदार्थ तळून झटपट मुलांना देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा