१८ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विलिंग्डन महाविद्यालयाच्या आवारास ‘क्रांतिवीर वसंतदादा पाटील साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनात १५ परिसंवाद, मोठ्यांची तीन आणि बालकांचे एक कविसंमेलन, एक विशेष मुलाखत, शाखा संमेलन, मनोरंजनाचे तीन कार्यक्रम, दोन सत्कार, कथाकथन यांशिवाय उद्घाटन, समारोप व खुले अधिवेशन होणार आहे. दिवसनिहाय कार्यक्रम असे.
शुक्रवार १८ जानेवारी २००८ ग्रंथदिंडी- वेळ - दुपारी दोनपूर्वी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ज्योती आणि ग्रंथदिंडी निघतील. त्या दोन वाजता सांगलीत पोहोचतील. त्या नंतर राममंदिरपासून मुख्य ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. तिचा समारोप क्रांतिवीर वसंतदादा पाटील साहित्यनगरीत होईल. दिंडीत काही पूर्वाध्यक्ष, महामंडळाचे पदाधिकारी, निमंत्रित सदस्य सहभागी होणार आहेत.
ग्रंथ आणि अन्य प्रदर्शनांचे उद्घाटन :- वेळ- सायंकाळी सव्वा पाच वाजता
ही रात्र लोककलाकारांची वेळ - रात्री साडेआठ वाजता उद्घाटन- ज्येष्ठ तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या हस्ते