यजमानाला रक्षाबंधन

NDND
रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या बंधनाला प्रेमाच्या धाग्यात बांधतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून आपल्या संरक्षणाचे बंधन बांधते. त्यालाच आपण राखी असे म्हणतो. राखीचा अर्थ एखाद्याला आपल्या संरक्षणासाठी बांधून ठेवणे, असा आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला सूताच्या धाग्याची राखी बांधून आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर सोपविते.

या दिवशी केवळ बहिणच भावाला राखी बांधते असे नाही. या सणात दुसर्‍याच्या सुरक्षेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी लवकर उठून प्रातकालीन कर्मे आटोपली पाहिजेत. स्नान-ध्यान करून स्वच्छ वस्त्रे घातली पाहिजेत. सूताच्या वस्त्रात तांदळाची लहान पोती बांधली पाहिजेत. त्यांच्यावर केशर किंवा हळद घालावी.

NDND
गायीच्या शेणाने घर सारवून घ्यावे. तांदळाचे पीठ मातीच्या घड्यात घालून कलशाची स्थापना करा. पुरोहिताला बोलावून विधीपूर्वक कलशाचे पूजन करा. पूजेदरम्यान तांदळाच्या गाठीला पुरोहित यजमानच्या मनगटावर बांधतो आणि हा मंत्र म्हणतो.
'येन बुद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:!
तेनत्वामभिबघ्नामि रक्षें माचल-आचल:!'