ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:12 IST)
ज्येष्ठ पत्रकार आणि ख्यातनाम विचारवंत दिलीप पाडगावकर  (७२) यांचे  निधन झाले आहे. पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाडगावकरांवर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचीत होते. तर काश्मीर प्रश्नाबाबतचा त्यांचा अभ्यास  होता. पाडगावकरांनी 1978 ते 86 या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये  आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी  म्हणून काम पाहिले. तर 1988 ते 1994 पर्यंत टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते. फ्रान्सने 2002 मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरवले होते.

वेबदुनिया वर वाचा