Biography :कादंबरीकार मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (15:22 IST)
विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म 19 जानेवरी 1898 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांना शालेय काळात नाटकात अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. त्यांनी अनेक नाटकात अभिनय केला होता.नंतर त्यांनी अध्यापनात रुची दाखवून शिरोड शहरात शालेय शिक्षक झाले.शिरोड जाणे त्यांचा साठी आणि त्यांच्या साहित्यकृतींसाठी सुपीक ठरले.त्यांची 1941 मध्ये वार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.
त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत  उत्कृष्ट  लेखन केले. त्यांचे लेखन ध्येयवादी आहे.त्यांच्या लेखनात माणुसकीचा गहिवर उमटून दिसतो.त्यांनी वृत्तपत्रीय लेखनात व ग्रंथ संपादनात आपला ठसा उमटवला.

त्याच्या लेखणीतून अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ दिसते.लालित्यपूर्ण भाषा,रम्य कल्पना,कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कल्पनाशक्ती तल्लख होती त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनातून दिसून येतो.मनोरंजन आणि समाजजीवनावर भाष्य करणे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते.रूपक हा प्रकार त्यांनीच रूढ केला.त्यांना जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जाते.त्यांनी ययाती या कादंबरीत सह 16 कादंबऱ्या लिहिल्या आहे.त्यात हृदयाची हाक,कांचनमृग,उल्का, पहिले प्रेम, अमृतवेल, अश्रु, सोनेरी स्वप्ने भंगलेली हे आहे.त्यांच्या कादंबरीवर छाया, ज्वाला,देवता,अमृत,धर्मपत्नी आणि परदेशी असे चित्रपट मराठीत बनले. हिंदीमध्ये ज्वाला, अमृत आणि धर्मपत्नी या नावांनी चित्रपटही बनवले गेले. त्यांनी लग्ना पहावे करुन या मराठी चित्रपटाची पटकथा आणि संवादही लिहिले.
 
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.
 
त्यांना अनेक मराठी पुरस्कारांव्यतिरिक्त साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले असून भारतीय साहित्याचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. 1998 मध्ये सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्मारक टपाल तिकीट जारी केले. मराठीच्या या प्रसिद्ध लेखकाचे 2 सप्टेंबर 1976 रोजी निधन झाले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती