मागं वळून बघतांना, सहज नजर गेली जे सुटून गेलं,
ते ही गेलं होतं बदलून, जे होतं तेव्हा सुटलेलं,
खाणाखुणा चाचपडून बघितल्या आर्ततेन,
त्याही गेल्या होत्या बदलून, काळ लोटल्यानं,
सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?
आठवणींत ते अजूनही सुरक्षीत आहेत हेच खरं,
कित्ती खेळ, कित्ती वस्तू हव्या होत्या तेव्हा,
नाहीतच मिळाल्या, वाईट वाटतं केव्हा केव्हा!
वाटतं तिथली धूळ झटकून बघावी,
आपली ओळख मिळतेय का तिथं शोधावी,
नाही मिळणार पूर्ण, पण सापडावी, खुण एखादी,