दुसऱ्या पेक्षा मी आहे सुखी असं कुणीच म्हणत नाही

मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (21:44 IST)
आपल्या आपल्या वाटच सुखं दुःख, येतो प्रत्येक जण घेऊन,
ते मात्र जावेच लागते त्यास त्यास भोगून,
तरीही प्रत्येकास वाटतं, माझं दुःख हे भलं मोठ्ठ,
संकटाशीच काय माझी पडलीय बरं गाठ?
सुखं भोगतांना मात्र ही जाणीव होत नाही,
दुसऱ्या पेक्षा मी आहे सुखी असं कुणीच म्हणत नाही.
तुलना होणं कधी शक्य आहे का कधी ह्याची,
अडकलाय प्रत्येक जण, धडपड फक्त निघण्याची,
हेंच तर खरं सार संसाराचं, कळलंच पाहजे,
सुखदुःखा शी हातमिळवणी करून जगता यायलाच पाहीजे! 
..अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती