×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
बॅग कशी भरायची ?
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (13:59 IST)
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
फापट पसारा आवरून सारा,
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
याच्या साठी त्याच्या साठी,
हे हवं, ते हवं
इथे तिथे - जाईन जिथे,
तिथलं काही नवं नवं
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आजवर त्रस्त होतो.
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो
काय राहिलं, कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे,
कुठे काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे.
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाःचं भान दिलं
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, मी,तू
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
आत बाहेर काही नको
आत फक्त एक कप्पा,
जना - मनात एकच साथी
सृष्टी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मितीला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद विरक्त होत जायचं आहे.
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
आला आला शीत ऋतूचा आनंद बहार!
आवळा नवमी कथा Amla Navami Katha
भाऊबीज कथा Bhai Dooj Pauranik Katha
नरक चतुर्दशी कथा Narak Chaturdashi Katha
कहाणी गोड पदार्थांची...गुलाबजाम आणि जिलबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
नवीन
Nag Panchami 2025 : नैवेद्यात बनवा बुंदीची खीर रेसिपी
फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते,दुष्प्रभाव जाणून घ्या
डिप्लोमा इन सिरॅमिक इंजिनीअरिंग करून करिअर बनवा
महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना ही खबरदारी घ्या
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्ही नैराश्याचे बळी ठरू शकता, उपचार जाणून घ्या
अॅपमध्ये पहा
x