कोण काय, किती अन कसं जगणार,
काळाने घातलेलं आहे कोडं, तोच सोडवणार,
फक्त दरम्यानच आयुष्य आपलं आहे,
ते कसं घालवायच ते आपल्याला ठरवायच आहे,
प्रवास हा मजल दरमजल करत करायचा,
भेटलेल्या सहप्रवास्या शी वेळ घालवायचा,
कोणाची क्षणिक भेट आठवताच पळतो ताण,
कोणाची साथ खुप काळ, पण त्याची नसते जाण,
काही मात्र उगाचच करतात लुडबुड,
काही मात्र राहतात सानिध्यात पण उगवतात सूड,
काही दाखवतात स्वप्न रंगबेरंगी सूंदर,
काहीं सोबत वाटे तरंगावे आपणही हवेवर,
असा हा प्रवास थांबतो अचानकच एकदा,