प्राजक्ताचा सडा

NDND
प्राजक्ताच्या पनोपानी ‍कितिक सजल्या बघ कलिका
केशरी लेंग खालती आणिक वरती धवल पहा बुरखा

हिरव्या काळ्या मखमालीवर फुले पसरली मुक्तपणे
प्राजक्ताचा गंध उधळुनी समीर नेतो धुंदपणे

आकाशाशी हितगुजणार्‍या कळ्या पाहती धरणीला
बहरील फुले सडा घालुनी गंधित करती मातील

उद्या आम्हीही अशी सुगंधी वृष्टी सुंदर करणार
परडीत झुलुनी हांसत जाऊनी श्रीकृष्णाला पूजणा

स्वप्नामध्ये रात्र संपली अरूण हलके जागवितो
आनंदाने बहरूनी देतो सर्व कळ्यांना हासवितो

शत शत राशी प्राजक्ताच्या कृष्ण दावितो मांगल्य
आज गंधू द्या हसू द्या उद्या व्हायचे निर्माल्

आज हासणे उद्या मलूलणे जीवन रीत जगायची
निर्माल्याला सरित्सागरी प्राप्त होतसे संगत विष्णू चरणाच

सुगंधी सुंदर जीवन देण्या रोज बहरती लाख कळ्या
निर्माल्यास्तव बघुनी कशाला खंत करावी मना खुळ्या.

वेबदुनिया वर वाचा