लेमन चिकन रेसिपी

शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (13:30 IST)
साहित्य-
बोनलेस चिकन
एक चमचा जिरे
दोन कांदे
एक चमचा आले लसूण पेस्ट
काश्मिरी लाल मिरची
एक इंच आले
दोन हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा हळद पावडर
एक चमचा धणेपूड
एक कप लिंबाचा रस
कोथिंबीर
ALSO READ: यखनी सूप रेसिपी
कृती-
सर्वात आधी चिकनचे तुकडे स्वच्छ करून कापून एका भांड्यात ठेवावे. आता चिकनमध्ये लिंबाचा रस, आले-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे.सर्व मसाले मिसळल्यानंतर, चिकन अर्धा तास रेफ्रिजरेटरमध्ये झाकून ठेवावे .एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात चिकनचे तुकडे घाला आणि ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. आता तळलेले चिकनचे तुकडे प्लेट मध्ये काढून त्यावरून कोथिंबीर गार्निश करावी आता वरून लिंबू पिळून घ्या, चाट मसाला शिंपडा. तर चला तयार आहे लेमन चिकन रेसिपी, कांदा आणि कोथिंबीर चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
ALSO READ: स्वादिष्ट अंडा करी रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: झटपट बनणारा स्वादिष्ट चिकन पुलाव रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती