कृती-
सर्वात आधी एका भांड्यात पाणी घ्यावे त्यात सर्व अंडी घालून उकळवून घ्यावी.अंडी १० मिनिटांत उकळतील. थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्यावे. आता एका पॅनमध्ये थोडे तेल घालून झाल्यावर ही अंडी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. आता कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. यानंतर, हळद, गरम मसाला, मिरची पावडर, धणे पावडर असे सर्व मसाले एका भांड्यात घालावे. या मसाल्यांमध्ये कांदा-लसूण पेस्ट घालावी आणि चांगले मिसळा. पॅन पुन्हा गॅसवर ठेवा, त्यात मोहरीचे तेल घाला आणि चांगले गरम करा. पॅनमध्ये कांदा आणि मसाल्याची पेस्ट टाका आणि परतून घ्या. मसाल्यांना तेल सुटू लागल्यानंतर त्यात तळलेले अंडी घालावी. ग्रेव्ही बनवण्यासाठी त्यात एक ग्लास पाणी घालावे. झाकण ठेवून १० मिनिटे उकळू द्या. आता गॅस बंद करा. व आता वरून कोथिंबीर आणि मिरचीचे बारीक तुकडे गार्निश करावे. तर चला तयार आहे स्वादिष्ट अंडा करी रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.