मीठ
कृती
भांड्यात दोन चमचे तेल गरम करा आणि किसलेलं खोबरं भाजून घ्या. त्यात धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद घाला आणि चांगले परता. मिश्रणाचा रंग तपकिरी झाल्यावर त्याची पेस्ट बनवा आणि बाजूला ठेवा.
आता एक भांडे घ्या आणि थोडे तेल गरम करा. त्यात थोडी कढीपत्त्याची पाने घाला. त्यात, छोटे कांदे, आलं, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचे मिश्रण घाला. थोडा वेळ भाजा. आता कोंबडीचे तुकडे आणि मीठ घालून परता. दोन कप पाणी घाला. सावकाशपणे ढवळा. भांड्यावर झाकण घालून काही वेळ शिजू द्या.