साहित्य- 1/2 किलो बोनलेस मटन, 1/2 किलो बासमती तांदुळ, 50 ग्रॅम कांदे, 4 ग्रॅम कलमी, 4 ग्रॅम इलायची, लवंग, 1 तेजपान, 2 ग्रॅम शाही जिरे, 10 ग्रॅम कापलेल्या हिरव्या मिरच्या, आले व लसणाच्या पाकळ्या वाटलेल्या, 5 ग्रॅम तिखट, 10 ग्रॅम पुदिना, कोथिंबिर, 400 ग्रॅम दही, केशर, 50 ग्रॅम दूध, 50 ग्रॅम तूप, 250 ग्रॅम मळलेली कणीक, मीठ चवीनुसार.
कृती- सर्वप्रथम मटन धुऊन पाणी काढून टाकावे. दहीला फेटून त्यात कोथिंबिर, पुदिना व हिरव्या मिरच्या टाकाव्यात. केशर दूधात टाकून तापवून घ्यावे. दह्यात मटण मेरीनेट करावे. कढईत तूप, गरम मसाले, तिखट, मीठ आणि कांदे टाकून 30 मिनिटासाठी ठेऊन द्यावे.
तांदुळ स्वच्छ करून 20 मिनिट भिजवून ठेवावे. एका भांड्यात अर्धा लीटर पाणी उकळत ठेऊन त्यात मीठ, उरलेले गरम मसाले टाकावे. पाणी उकळ्यानंतर त्यात तांदुळ टाकावे. भात तयार झाल्यावर केशर मिश्रित दुधाचा अर्धा भाग मटनावर शिंपडावे. शिजलेल्या भात मटनावर पसरावा. उरलेले केशर मिश्रीत दूध तांदुळावर टाकावे. उरलेल्या तुपाला गरम करून भातावर टाकवे.