प्रॉन्झ करी विथ ग्रीन मॅंगो..

साहित्य: मध्यम आकाराची कोलंबी साधारण ३०० ग्रॅम, हळद अर्धा चमचा, आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, एक मध्यम आकाराची कैरी, खवलेला नारळ एक वाटी, ५ सुकलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा धणे, मिरदाणे, ४ चमचे तेल, कडीपत्ता, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेला कांदा, नारळाचे दूध, मीठ चवीनुसार 
 
कृती: कोलंबीला हळद, आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवावे. कच्ची कैरी तुकडे करून ठेवावी. खवलेला नारळ, तिखट, धणे, मिरी यात थोडं पाणी घालून पेस्ट करावी. फ्राईंग पॅनमध्ये कडीपत्ता टाकून त्यात हिरव्या मिरच्या तडतडू द्याव्यात. त्यानंतर कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतावा. त्यात कोलंबी घालून वरील पेस्ट त्यात घालावी. त्यानंतर एक कप पाणी घालून दोन मिनिटं उकळी येऊ द्यावी. वरून नारळाचे दूध घालून हलवत राहावे. हा पदार्थही गरमागरम सव्‍‌र्ह करावा.

वेबदुनिया वर वाचा