Funny Ukhane नवीन पिढीचे विनोदी उखाणे
शुक्रवार, 23 मे 2025 (17:23 IST)
सप्तपदीच्या वाटेवर …राव मी तुम्हाला साथ देईन,
पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना
माझ्यासाठी चार साड्या पण घेईन.
महाराष्ट्रात प्रसिद्ध जंगल आहे ताडोबा,
---- राव बाहेर आहेत मांजर, आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.
बायकोच्या हातचा चहा प्यावा लागतो,
नाहीतर रात्री झोपताना पाय धरावा लागतो
समुद्र कितीही खवळला तरी, किनाऱ्यावर आदळतात लाटा,
---- राव कितीही पिले तरी, विसरत नाही घरच्या वाटा.
सासरचं पाणी प्यालं की पोट फुगतं,
माहेरचं नाव घेतलं की डोकं दुखतं
प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण ---- रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.
माहेरचं नाव घेतलं की नवर्याला फुटतो घाम
कारण त्याच्या हातात नेहमीच असतो जाम
सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.
फुलांचा राजा आहे गुलाब,
---- ला होतात, नेहमी जुलाब.
नवर्याचं नाव आहे सागर,
पण त्याच्या खिशात आहे फक्त खणखणीत खागर.
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय
… राव घरी परतले नाहीत, कुठे पिऊन पडले कि काय.
प्रत्येक नाक्यावर भेटते, सिग्रेट आणि चहा ची टपरी,
---- राव आहेत, एक नंबर चे छपरी.
बायकोच्या हातात आहे स्वयंपाकघर,
पण नवऱ्याच्या डोक्यात आहे फक्त बकर.
व्हीस्की पेक्षा, छान आहे वोडका,
---- आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.
सासरचं नाव आहे मोठं,
पण बायकोच्या तोंडात आहे फक्त खोटं.
---- राव आणि माझा, संसार होईल सुखर,
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.
मी कोणाची नाही करत नक्कल
पण काय करु यांना पडत चाललीये टक्कल
चहा सोबत लागतो, चांगला मस्का पाव.
---- रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.
दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब,
---- अहो कमी प्या, नाहीतर येतील कोंब.
कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,
---- रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.
प्रेमात मी झालो हिच्या, येडा पिसा,
---- च नाव घेतो, तिच्यामुळे झाला माझा खाली खिसा.
बघणार असेल कोण तर, दाढी करण्यात अर्थ आहे,
---- बघणार असेल तर, अंघोळ करणे सुद्धा व्यर्थ आहे.
जोरदार वाऱ्याने, घरावरचे पत्रे गेले उडून,
---- रावांचे कमी वयात, टक्कल पडले पुढून.
इंग्लिशमध्ये पतंगाला, म्हणतात काईट,
---- राव आज होऊन आले आहेत, फुल टाईट.
टोपली ठेवले होते आंबे ते गेले सडून,
---- चे नाव घेते नाकातला शेंबुड फुरकन वडून