Relation Tips: प्रेयसीला चुकून ही या 5 गोष्टी सांगू नका नाही तर नातं तुटू शकतं

सोमवार, 2 मे 2022 (22:34 IST)
कोणत्याही नात्यात येणे हा मुला-मुलींसाठी एक नवीन अनुभव आणि आव्हान असते. जिथे आधी फक्त स्वतःच्या सुखाची काळजी घेतली जायची, पण नात्यात आल्यानंतर जोडीदाराची काळजी देखील घ्यावी लागते. त्याला सुख दुःखात साथ देणं ,काळजी घेणं, प्रामाणिक राहणं ,वेळ देणं या चांगल्या नात्यातील मूलभूत गरजा असतात. त्यामुळे नातं चांगलं आणि दृढ राहतं.नात्यात आल्यानंतर एकमेकांशी खूप प्रेमाने बोलायला बरं वाटतं. पण बऱ्याच वेळा नात्यात मुलांकडून मुलींना अशा काही लहान सहन गोष्टी सांगितल्या जातात त्या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. 
 
अशा परिस्थितीत नात्यात आल्यावर मुलांनी काही गोष्टी मैत्रिणीला सांगू नये. काही गोष्टी प्रेयसीकडून लपवायच्या असतात. जेणे करून तुमचे संबंध दीर्घकाळापर्यंत चांगले राहतील. चला तर मग जाणून घ्या. 
 
1. आपल्या माजी प्रेयसी बद्दल प्रत्येक लहान गोष्ट सांगणे-गर्लफ्रेंडला तुमच्या एक्सबद्दल सांगणे ही चांगली गोष्ट आहे, पण काही मुलं त्यांच्या एक्स प्रेयसीबद्दलची प्रत्येक छोटी गोष्टही सांगतात, ज्यामुळे तुम्हाला नंतर समस्या येऊ शकतात. कदाचित काहीवेळा तुमचा एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि अशा परिस्थितीत तुम्ही माजी मैत्रिणीबद्दल बोललात तर तुम्हाला खूप काही ऐकायला मिळू शकतं .यासाठी आपल्या माजी प्रेयसी बद्दल सर्वकाही सांगणे टाळावे. 
 
2 मैत्रिणी समोर इतर मुलीचे कौतुक करणे- प्रत्येक मुलीला तिच्या प्रियकराने फक्त तिची प्रशंसा करावी असे वाटते. आता जर तुम्ही तिच्याकडून इतर कोणत्याही मुलीची प्रशंसा केली तर ती तुमच्या नात्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. वास्तविक, कोणत्याही मुलगी आपल्या समोर कोणत्या इतर मुलीची स्तुती केलेली चालत नाही.अशा परिस्थितीत नात्यात दुरावा येण्याची शक्यता असू शकते म्हणून आपल्या प्रेयसी समोर इतर मुलींचे कौतुक करणे टाळा. 
 
3 वारंवार बँक  बॅलन्स बद्दल बोलणे- कदाचित तुमची बँक बॅलन्स चांगली असेल. पण जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला तुमचा बँक बॅलन्स आणि इतर गोष्टींबद्दल सतत सांगत असाल तर तिला ही गोष्ट आवडणार नाही. याचे साधे कारण म्हणजे आजच्या काळात बहुतांश मुली आपल्या जोडीदाराप्रमाणे आपल्या पायावर उभ्या आहेत आणि आपल्या गरजांसाठी त्या कोणावरही अवलंबून नाहीत.अशा परिस्थितीत जर मुल पुन्हा पुन्हा पैशाबद्दल बोलत असतील तर प्रेयसीला ही गोष्ट आवडणार नाही आणि वारंवार नात्यात पैशाला आणल्यामुळे नातं संपुष्टात येऊ शकतं. 
 
4. ड्रेसवर टिप्पणी करणे-काही मुलांना सवय असते की ते प्रत्येक वेळी मैत्रिणीच्या ड्रेसवर कॉमेंट्स करतात.आज हा कसा रंगाचा ड्रेस घातला आहेया ड्रेसची डिझाईन चांगली नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या ड्रेसवर प्रत्येक वेळी कमेंट करत राहिलात तर तिला वाईट वाटू शकते.म्हणूनच मुलीच्या पेहरावाबद्दल कधीही काहीही मत मांडू  नका  पोशाखाबद्दल जर पोरांना काही त्यांचे मत मांडायचे असेल तर ते प्रेयसीला प्रेमाने बोलू शकतात किंवा समजावून सांगू शकतात.पण नकारात्मक पद्धतीने बोलल्याने नातेसंबंध धोक्यात येऊ शकतं. 
 
5. इतरांशी तुलना करणे  -ही गोष्ट प्रत्येकाला लागू होते. जर तुम्ही कोणत्याही स्त्रीची कोणाशीही तुलना केली तर तिला ते आवडत नाही. आता अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडची तुलना एखाद्याशी केली तर तिला ते आवडणार नाही याचे कारण म्हणजे आजच्या काळात प्रत्येकजण स्वतःची ओळख बनवतो आणि त्यातूनच ओळखली जावी असे वाटते. म्हणूनच गर्लफ्रेंडशी तुलना करणारे शब्द बोलू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती