पावसाळा हा निसर्गापासून मनुष्यापर्यंत सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये ज्याप्रमाणे निसर्ग बहरत, त्याप्रमाणे मानवी प्रेमसंमंधही फुलताना आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. पावसाळ्यातले रोमँटिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहूल देऊन जाते. पण, हा पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला तरी, तो बेभरवशाचा आहे, त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या.
कपडे : तुमच्याकडे छत्री किंवा पावसाळी कोट असला तरी, तो तुमचे शंभर टक्के सरक्षण करीलच असे नाही, त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना सुती कपडे घाला, जेणेकरून ते ओले झाले तरी लवकर कोरडे होतील.
मेकअप : पावसाळ्यात बाहेर जाताना मेकअपची विशेष काळजी घ्यावी. कारण, पाण्याने मेकअप खराब झाला, तर ऐनवेळी पंचाईत होईल. त्यामुळे शक्यतो पासळ्यात डेटवर जाताना वाटरप्रूफ मेकअप करा.
आरोग्य : पावसात भिजण्याचा आनंद प्रत्येकालाच हवाहवासा असतो. मात्र, पावसात भिजल्यानंतर तुम्हाला सर्दी, ताप, येणार नाही ना, याची काळजी घ्या.
स्थळ : पावसाळ्यात डेटवर जाणे म्हणजे, एक पर्वणीच असते. अशावेळी चारभिंतीत वेळ घालवण्यापेक्षा मोकळ्या निसर्गात फिरायला कोणालाही आवडेलच. मात्र, डेटवर जाण्याअगोदर त्या ठिकाणची योग्य माहिती घ्यायला विसरू नका.
वाहन : जर दुचाकीवर फिरायला जाणार असाल, तर जास्त लांब जाणे धोक्याचे ठरू शकते. कारण, रस्ता ओला झाल्याने अपघतांचे प्रमाण वाढते. शिवाय दुचाकी चालवतानाही काळजी घ्या.