गार पाणी पिणे टाळा
योग करताना गार पाणी पिणे टाळावे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. योग दरम्यान शरीर उष्ण होत अशात गार पाणी पिण्याने सर्दी, कफ आणि ऍलर्जी सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणून योग केल्यानंतर सामान्य पाणी पिणे योग्य ठरेल.
थट्टा नको
योगासन करताना मोबाइल ऑफ करावा तसेच लक्ष केवळ योगावर असावे कारण चुकीची स्टेप धोकादायक ठरू शकते. तसेच या दरम्यान मजा-मस्ती करणे टाळावे कारण योग एक साधना आहे, जी एक्सपर्टच्या सल्ल्याने व्यवस्थित रूपाने केल्यास फायदा होतो.