गर्लफ्रेंड पजेसिव्ह असल्यास या गोष्टी अजिबात करू नका!

प्रेमात पडणं तसं फार सरळसोपं आहे. पण गोडगुलाबी धुंदीमध्ये जर तुम्ही अगदीच पजेसिव्ह गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडलात तर मात्र जरा जपूनच राहा. तुमची गर्लफ्रेंड क्रेझीअसल्यास तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी जरा थोडा विचार करा. कारण की छोटय़ा छोटय़ा गोष्टीमुळे तिची नाराजी तुम्हाला ओढावून घ्यावी लागू शकते. 
 
गर्लफ्रेंड रागावू नये यासाठी काही गोष्टी ध्यानात असू द्या: तुमच्यासोबत इतर तरुणीचा फोटो पोस्ट करणं जरा टाळाच. गर्लफ्रेंडच्या फ्रेंडस्च्या स्टेटसवर कमेंट करणं टाळा. सिनेमा पाहताना सोशल मीडियावर आपलं स्टेटस अपडेट करु नका. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही कामामध्ये असाल आणि तुमच्या गर्लफ्रेंडने काही मेसेज पाठविला असल्यास तो ओपन करु नका. गर्लफ्रेंड आणि आपला कोणताच फोटो शक्यतो डिलीट करु नका. आपण कुठं आहोत याचं स्टेटस सोशल मीडियावर अपडेट करु नका. तुमच्या गर्लफ्रेंडला चुकूनही अनफ्रेंड करू नका.

वेबदुनिया वर वाचा