सेक्स लाईफची 18 सूत्रे!

ND
ND
'वैवाहीक जीवन' यशस्वी होणे हे बहुतांश 'सेक्स लाईफ'वरही अवलंबून असते. ते फुलण्यासाठी प्रत्येक रात्र आनंदी, उत्साही व उत्तेजित होणे गरजेचे आहे. त्यासाठीच सेक्स लाईफची ही 18 सुत्रे आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.

1. डान्स करावा-
आपल्या पार्टनरसोबत डान्स करावा. डान्स जमत नाही, हे कारण चालणार नाही. प्रेमात 'नाचना जरूरी है'. कारण नाचण्याने सेक्स अपील क्रिएट होत असते.

2. वर्क आऊट-
डेली वर्क आऊट केल्याने बॉडी ही अधिक सेक्सी बनते. त्याने सेक्स ताकद वाढीस लागते. शरीर अधिक लवचीक होऊन कामसूत्रातील आसनं करून अधिक प्रणयानंद अनुभवू शकता.

3. म्युझिक-
प्रत्येक प्रकाराचे म्युझिक सेक्स लाईफसाठी फायदेशीर ठरत असते. 'पार्टनर'सोबत सेक्स करताना म्युझिकच्या प्रत्येक रिदमची आपल्याला साथ असते. सेक्समध्ये मूड क्रिएट करण्याचे कार्य म्युझिक करत असते. गाण्यातील मर्मभेदी शब्द आपल्या मनातील सुप्त भावना भडकवण्याचे कार्य करतात.

4. शेअर फॅंटेसी-
एकमेकांमध्ये दररोज किमान एक फॅंटेसी तरी शेअर करावी. त्यानंतर त्याच्यावर दोघांनी एक्सपेरीमेंट करावे. तेव्हा कुठे तुमच्या सेक्स लाईफला रंग चढायला सुरवात होईल.

5. संवाद-
आपल्या पार्टनरकडून प्रत्येक वेळी सेक्शुअल प्लेजरची अपेक्षा करावी. त्यासाठी प्रणयात सेक्स अपील करणारा संवाद साधावा. या संवादाचा आपल्या सेक्स लाईफवर अनुकूल प्रभाव पडतो.

6. प्ले गेम्स-
घरातील माहोल पाहून आपल्या पार्टनरसोबत कॉम्प्यूटर किंवा टीव्हीवर सेक्स गेम्स खेळावे. अशा प्रकारचे गेम्स गेम स्टोर्समध्ये सहज उपलब्ध होतात. मात्र, गेम्स हे मस्तीने भरपूर व उत्तेजनेने ओतप्रोत भरलेले असावेत. आपल्यात उत्साह निर्माण करण्‍याचे सामर्थ्य या गेम्समध्ये पाहिजे.

7. लव्ह नोट्‍स द्या-
प्रणयक्रिडेसाठी लव्ह नोट्‍स खूप महत्त्वाच्या ठरतात. आपल्या 'पार्टनर' संदर्भात मनातल्या पानावरचे कागदावर पानावर उतरविले लिखाण दाखवून आनंदाची एक वेगळी अनुभूती घ्यावी.

8. रोमॅंटिक मूव्ही बघा-
आपल्या पार्टनरसोबत रोमॅंटिक मूव्ही बघा. जर आपल्या पार्टनरची हरकत नसेल तर आपण सेक्सी चित्रपटही बघू शकता. त्यानंतर सेक्सचा मनसोक्त आनंद तुम्ही म‍िळवू शकता.

9. नेहमी फ्रेश रहा-
हायजीन (स्वच्छता) सेक्स आनंद लुटण्याकरीता खूप आवश्‍यक आहे. आपल्या पार्टनरकडून सर्वांगास 'kiss' करून घेण्‍यासाठी आधी अंघोळ करून बॉडी स्प्रे किंवा परफ्यूम वापरला पाहीजे. तोंड ब्रश करून माउथवाशने क्लीन करावे. तसेच आपली गुप्तांगे ही स्वच्छ केली पाहिजेत. सुगंधीत शरीरावर ओठ टेकवण्यात आपल्या पार्टनरला नक्कीच आनंद मिळेल.

ND
ND
10. सेक्सी कपडे परिधान करावे-
प्रणयक्रीडा करताना सेक्सी नाईटी किंवा नाइट सूट परिधान करावा. तो ही आपल्या पार्टनरच्या पंसतीचा असेल तर क्या बात है. सेक्स अपील करणार्‍या कपड्यांमुळे तुम्ही एकमेकांकडे आकर्षित व्हाल.

11. सेक्सुअल मसाज-
पार्टनरचे आपल्याकडे वेधून घेण्‍यासाठी 'मसाज' आवश्यक असते. सगळ्यात आधी बॅक मसाज करावी. त्यानंतर पाय व सन्सेटिव्ह भागांवर हलका मसाज करावा. यावेळी तुम्ही‍ सुगंधीत सेक्सुअल ऑईलचाही वापर करू शकता.

12. वॉट टर्न्स यू ऑन-
एखाद्या वेळी पार्टनर तुम्हाला उत्तेजित करू शकत नसेल तर तुम्हाला त्याच्याकडून कुठली अपेक्षा आहे, हे सांगण्यास संकोच करू नका. सेक्समध्ये आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.

13. एकत्र अंघोळ करावी-
आपल्या पार्टनरसोबत अंघोळ करावी. एकत्र अंघोळीचे रोमांचक क्षण तुमचा सेक्सुअल प्लेझर जागृत ठेवण्यास मदत करतील.

14. मोठ्याने श्वास घेण्याचा प्रयत्न करा-
मोठ्याने घेतलेल्या श्वासामुळे दोघांमध्ये उत्तेजना निर्माण होत असते.सेक्स करण्यापूर्वी मोठ्याने श्वास घ्या. असे केल्याने प्रणयातला खरा आनंद तुम्ही उपभोगू शकाल.

15. एकमेकांमध्ये हरवून जा-
चुंबन व सेक्स करताना चुकूनही डोळे बंद करू नका. एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघा. त्याने प्रणयानंद द्विगुणीत होत असतो.

16. पोजिशन (आसने)-
लग्नानंतर कामसूत्र जरूर वाचा. तसेच त्यात सांगितलेले विविध आसने करून प्रणयानंद घेण्याचा प्रयत्न करावा. दररोज वेगवेगळे आसन करावे. त्याने तुमचे सेक्स लाईफ बोअर होणार नाही.

17. काल्पनिक बना-
कल्पना करायला शिका. आपल्या पार्टनरसमोर प्रणयाची काल्पनिक दृश्ये उभी करा. अशी काल्पनिक दृश्‍ये अधिक उत्तेजीत करणारी ठरतात.

18. एकमेकांना समजून घ्या-
सेक्स करताना आपल्या पार्टनरला समजून घेणे फार महत्त्वाचे असते. तरच दोन शरीर, दोन मन, दोन हृदय एकत्र येत असतात. सेक्समध्ये समाधान महत्त्वाचे असते. पार्टनरची अपेक्षा जाणून घेवून तशा पध्दतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला समजून घेतल्यानंतरच तुम्हाला प्रणयानंद घेता येईल.

वेबदुनिया वर वाचा