सोप्या कुकिंग टिप्स

शनिवार, 20 मार्च 2021 (08:40 IST)
आम्ही सांगत आहो काही सोप्या किचन आणि कुकिंग टिप्स जे आपल्या कामी येतील चला तर मग जाणून घेऊ या.
 
* मिक्स व्हेज कटलेट बनवल्यावर त्याचे पाणी वरण किंवा सूप बनवायला वापरा या मुळे चव चांगली येईल. 
 
* दुधी हलवा करताना चव वाढविण्यासाठी या मध्ये मलई परतून घाला. 
 
* दही बडे करताना चविष्ट आणि मऊ बनविण्यासाठी वाटलेल्या डाळी मध्ये दही मिसळून फेणून घ्या. 
 
* मोड आलेली कडधान्य जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून फ्रिजमध्ये ठेवा. 
 
* कचोरी मऊ आणि चविष्ट बनविण्यासाठी मैद्यात दही घालून मळून घ्या. 
 
* मुगडाळ चिले खुसखुशीत बनविण्यासाठी डाळीत 2 मोठे चमचे तांदुळाचे पीठ मिसळा. 
 
* दही जमविताना दुधात नारळाचा तुकडा मिसळा दही 2 -3 दिवस ताजे राहील.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती