किचन सिंकमधून येणाऱ्या वासाने हैराण झालात, सिंक सुगंधित करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

बुधवार, 8 डिसेंबर 2021 (22:25 IST)
हिवाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यामुळे घराला वेगळाच वास येऊ लागतो, पण स्वयंपाकघरातील सिंक साफ न केल्यास त्याचा सर्वाधिक वास येऊ लागतो. बरीच साफसफाई करूनही किचन सिंकमधून येणारा घाणेरडा वास काही कमी होत  नाही. आपल्या  स्वयंपाकघरातील सिंकमधूनही दुर्गंधी येत असेल तर  या टिप्स अवलंबवा . 
 
1 बेकिंग सोडा वापरा- स्टीलचे सिंक साफ करण्यासाठी  बेकिंग सोडा वापरू शकता. बहुतेक लोकांच्या घरात स्टेनलेस स्टीलचे सिंक बनवले जातात, अशा सिंक सहज साफ केल्या जातात. अशावेळी सिंक स्वच्छ करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा घाला आणि 15 मिनिटांनी स्क्रब करा. सिंक धुवून स्वच्छ करा. असे केल्याने सिंक देखील पूर्णपणे स्वच्छ होईल आणि दुर्गंधी नाहीशी होईल. 
 
2 कचरा साचवू  नका - बर्‍याचदा धुण्याच्या भांड्यांमध्ये थोडेसे अन्न राहते. कधीकधी भांडी धुतल्यानंतरही सिंकमध्ये कचरा जमा होतो. त्यामुळे सिंकला दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत सिंकमध्ये कचरा साचू देऊ नका. भांडी धुतल्यानंतर सिंकमध्ये जमा झालेला कचरा फेकून द्या. 
 
3 सिंक सुगंधित करा-जर सिंक सुगंधी बनवायची असेल तर आपण संत्री वापरू शकता. संत्र्याची साल सिंकमध्ये घासून घ्या. नंतर थोडा वेळ असेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. असे केल्याने सिंकचा वास दूर होईल आणि सिंक देखील चमकू लागेल. 
 
4 नॅप्थालीन किंवा डांबर गोळी वापरा- जर आपण सिंक साफ केला असेल, तर  त्यात नॅप्थालीनच्या किंवा डांबरी गोळ्या घाला. असे केल्याने सिंकमधून येणारा वास नाहीसा होतो.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती