चटणी बनवतांना या टिप्स अवलंबवा, अगदी आवडीने खातील सर्वजण

सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (13:10 IST)
चटणी बनवण्यासाठी सामान कमी लागतो. तसेच अनेक जण वेगवेगळ्या चटणी बनवण्यात एक्सपर्ट असतात. तुम्हाला देखील वाटत असेल की, आपल्याला देखील चविष्ट चटणी बनवता यावी तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही देखील चटपटीत चटणी बनवू शकाल की अगदी सर्व आवडीने खातील. 
 
1. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची देखील चटणी घट्ट आणि चविष्ट बनावी तर त्यामध्ये थोड्या प्रमाणात चणा डाळीचा उपयोग करावा. याकरिता चणा डाळ थोडावेळ भिजत घालावी. त्यानंतर मुख्य साहित्यासोबत बारीक करून घ्यावी. किंवा चणा डाळ भाजून देखील खाऊ शकतात. 
 
2. शेंगदाणे चटणीमध्ये कमी प्रमाणात वापरावे. कारण शेंगदाण्याची चव इतर साहित्यापेक्षा जास्त लागते. व चटणी खूप घट्ट देखील होते. म्हणून शेंगदाणे चटणी बनवतांना कमी प्रमाणात घालावे.
 
3. चटणी बारीक करतांना त्यामध्ये लिंबू पिळावा. लिंबाच्या रसाने चटणीची चव अप्रतिम लागते. जर तुम्हाला लिंबाची चव आवडत नसेल तर त्यामध्ये चिंच घालावी. व वरून लाल मिरचीचा तडका द्यावा. 
 
4. नारळाची पांढरीशुभ्र चटणी बनवण्यासाठी नारळाची पाठ पूर्णपणे काढून घ्यावी. तसेच चटणीचा रंग पंधरा राहण्यासाठी त्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करावे. तसेच मिरचीचे प्रमाण कमी घालावे.
 
5. अनेक वेळेस हिरवी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी चवीला कडू लागते. अश्यावेळेस चटणीचा कडू पणा घालवण्यासाठी त्यामध्ये मध किंवा साखर घालावी. चटणीची चव चविष्ट लागते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती