स्वयंपाक बनविण्याची आवड ठेवणाऱ्यांना काही सोप्या टिप्स ची आवश्यकता असते. जेणे करून अन्नाची चव वाढेल.चला तर मग जाणून घेऊ या अशा काही सोप्या टिप्स.
* बटाट्याचे पराठे खमंग बनविण्यासाठी गव्हाच्या पिठात 2 लहान चमचे हरभराडाळीचे पीठ मिसळा. कणीक मऊ भिजवा आणि 5 मिनिटे तसेच झाकून ठेवा. नंतर पराठे बनवा.पराठे खमंग बनतील.
* कढी करताना बऱ्याच वेळा दही फाटते आणि चव येत नाही असं होऊ नये या साठी हरभरा डाळीचे पीठ आणि दही एकत्र फेणून घ्या कढईत घोळ घालून सतत ढवळत राहा. कढी पूर्ण शिजल्यावर शेवटी मीठ घाला.
* भजे किंवा पकोडे कुरकुरीत बनविण्यासाठी हरभराडाळीचे पीठ थंड पाण्यात घोळा. या मुळे घोळ थंड होईल आणि तळताना भजे किंवा पकोडे तेल जास्त प्रमाणात शोषत नाही.
* फ्रूट कस्टर्ड क्रिमी करण्यासाठी सतत ढवळत राहा जेणे करून त्यामध्ये गाठी पडू नये आणि कस्टर्ड भांड्याच्या तळाशी चिटकू नये
* भाजी करताना ग्रेव्ही पातळ झाली असल्यास घट्ट करण्यासाठी टोमॅटो प्युरी घाला.प्युरी कच्ची घालू नका. टोमॅटो आधी शिजवून घ्या साली काढून चिमूटभर मीठ आणि साखर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. टोमॅटो प्युरी कच्ची घातल्यावर टोमॅटोचा कच्चा वास येईल.
* कुरकुरीत डोसा खाण्यासाठी डाळ, तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये मेथीदाणे घाला नंतर वाटून घ्या.
* वरणात फोडणी वरून दिल्यावर त्याची चव वाढते आणि वरण दिसायला देखील चांगले दिसतात. फोडणी तेलाची न देता साजूक तुपाची द्यावी.