* किशमिश हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यानं जास्त दिवस फ्रेश राहते.
* गोड धोड करताना जड बूड असलेले भांडे वापरा या मुळे डेजर्ट ची चव वाढेल आणि भान्डे जळणार नाही.
* लसणाला थोडं गरम केल्यावर त्याचे साल लवकर निघतात.
* हिरवे मटार सोलून पिशवीत घालून फ्रिजर मध्ये ठेवा. मटार ताजे राहतात.
* कडक लिंबाला थोड्यावेळ गरम पाण्यात ठेवल्यावर ते मऊ होत.
* मिरची चे देठ कापून ठेवल्याने मिरची ताजी राहते.