तेनालीरामची कहाणी: प्रतिवासी राजा

शनिवार, 11 मे 2024 (08:15 IST)
तेनलीरामला राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात विशेष मान होता. म्हणून राजमहलातील लोकांना त्यांच्यावर ईर्षा व्हायची. एक वेळची गोष्ट आहे. विजयनगर वर वेळ चांगली नव्हती. राज्यावर शेजारील देश केव्हाही आक्रमण करेल असे संकट उभे होते. तेव्हा दरबारातील एका व्यक्तीने विचार केला की, तेनलीरामच्या विरोधात राजाचे कान भारायचे हीच संधी आहे. 
 
एकदा राजा कृष्णदेवराय आपल्या बागेत बसून काहीतरी विचार करत होते. तेव्हा एक कपटी दरबारी तिथे आला. तो राजाला म्हणाला, महाराज तुम्ही रागवणार नसाल तर एक गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला न घाबरता बोल. दरबारी म्हणाला की तुम्हाला माहीत नाही, तेनालीराम शेजारील राज्यासोबत जोडलेला आहे. तो वेळोवेळी राजदरबारातील गुप्त बातम्या शेजारच्या देशातील राजाला देतो. हे ऐकताच राजाला खूप राग आला आणि ते म्हणाले मुर्ख! तेनलीरामबद्द्ल असे बोलतांना तुला लाज वाटत नाही का? तेनालीराम विजयनगराचा सर्वात प्रामाणिक नागरिक आहे आणि देशभक्त पण आहे. यावर दरबारी बोलला, हे खोट आहे महाराज त्याने तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून तुम्हाला त्याचा पाताळयंत्रीपणा दिसत नाही. पण मला पक्की बातमी मिळाली आहे. दरबारी एवढया विश्वासाने बोलत असल्यामुळे राजाला तेनालीराम वर थोडा थोडा संशय यायला लागला. 
 
राजाने लागलीच तेनलीरामला आपल्या दरबारात बोलावून घेतले आणि विचारले की, तेनालीराम तू शेजारील देशाचा गुप्तचर आहेस का? तेनलीरामला राजा असा प्रश्न विचारतील ही अपेक्षा नव्हती. तेनालीराम या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही आणि रडायला लागले. राजा म्हणाला की, "तुझ्या शांततेचा अर्थ असा आहे की आम्ही जे ऐकले आहे ते खर आहे." तेनालीराम म्हणाला, "महाराज मी तुम्हाला काय बोलू शकतो. तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखतात, म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. "हे ऐकून राजाला खूप राग आला. मग राजा कृष्णदेवराय म्हणाले की, विजयनगर राज्य तुला सोडावे लागेल. 
 
राजाच्या तोंडून हे कठोर शब्द ऐकून तेनालीराम तिथून निघून गेलेत. ते शेजारील राजाच्या दरबारात आले त्यांचे कौतुक करणारे अनेक गीत त्यांनी गाईले. तेनलीरामच्या कौतुक करण्याऱ्या गाण्यांनी राजा खुश झाला आणि ओळख मागितली. तेनालीराम बोलले की, "मी विजयनगरचे राजा कृष्णदेवराय यांचा खाजगी सचिव आहे."  राजा म्हणाला, "विजयनगर तर आमचे शत्रु आहे, मग तू तेथील रहिवासी असून माझ्या दरबारात कसा आलास, तुला भीती वाटत नाही का? " तेनालीराम म्हणाले, "तुम्ही आम्हाला शत्रु मानतात, पण आमचे राजा तुम्हाला मित्र मानतात. " हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की आमचे दरबारी सांगतात की, कृष्णदेवराय आम्हाला शत्रु मानतात. "तेनालीराम म्हणाले की विजयनगरचे दरबारी पण राजाचे असेच कान भरतात. पण आमचे राजा त्यांचे काहीच ऐकत नाही. ते तर तुमच कौतुक करतात. ते म्हणतात की शेजार्याशी शत्रुत्व ठेवणे चांगले नाही." राजाला तेनलीरामचे म्हणणे पटले आणि आवडले. राजा म्हणाला, "तू बरोबर बोलत आहे, पण आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा?" तेनालीराम म्हणाले, "मी स्वता त्यांचा खाजगी सचिव आहे आणि त्यांनी माला शांतिप्रस्ताव घेऊन पाठवले आहे." 
 
शेजारील देशाच्या राजाला तेनलीरामवर विश्वास बसला आणि राजा म्हणाला की, "आता आम्ही पुढे काय करावे?" तेनलीरामने उपाय सांगितला एक संधिपत्र आणि काही भेटवस्तू विजयनगर राज्यात पोहचवा आणि पुढे होऊन विजयनगरशी मित्रता स्वीकार करा. राजाला तेनालीरामचा उपाय चांगला वाटला. 
 
राजा कॄष्णदेवरायला तेनालीराम निर्दोष असल्याचे समजले होते. आणि त्यांना स्वताच्या वागण्यावर पश्चाताप होत होता. त्यांनी पाहिले की दरबारमध्ये तेनालीराम आणि शेजारील देशाचे राजाचे दूत संधिपत्र घेऊन हजर होते. त्यांच्या सोबत पुष्कळ भेटवस्तू देखील होत्या. राजा कॄष्णदेवरायांनी तेनालीरामकडे प्रेमपूर्वक पाहिले. त्यांना विश्वास बसला होता की, शत्रुला मित्र बनवायचे काम फक्त तेनालीराम करू शकतो. 
 
तात्पर्य - प्रामाणिकपणाचे फळ एकनाएक दिवस नक्की मिळते. तसेच कोणावरही पटकन विश्वास ठेऊ नये, असे केल्याने नेहमी स्वताचेच नुकसान होते. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती