तेनालीरामची कहाणी- दुर्दैवी कोण?

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (17:31 IST)
राजा कॄष्णदेवरायांच्या विजयनगर राज्यात चेलाराम नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो राज्यात या कारणामुळे प्रसिद्ध होता की, "जर कोणी सकाळी सकाळी त्याचा चेहरा पाहिला तर दिवसभर त्या व्यक्तीला अन्न मिळायचे नाही. लोक त्याला दुर्दैवी म्हणायचे. बिचारा चेलाराम या गोष्टीमुळे दुःखी व्हायचा. तरी पण तो आपल्या कामात व्यस्त रहायचा." एक दिवस ही गोष्ट राजाच्या कानापर्यंत पोहचली. राजा या गोष्टीला ऐकून उत्सुक झालेत. त्यांना जाणून घ्यायच्ये होते की चेलाराम खरच दुर्दैवी आहे का? आपली उत्सुकतेला दूर करण्याकरिता त्यांनी चेलारामला महलमध्ये हजर होण्यासाठी निरोप पठवाला. चेलाराम आनंदी होऊन महलकडे निघाला. महलात पोहचल्यावर राजाने जेव्हा त्याच्याकडे पाहिले. तर विचार करायला लागले की चेलाराम इतरांप्रमाणेच सामान्य आहे. या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी राजाने त्याला त्यांच्या शयनकक्षाच्या समोरील खोलीत थंबायला लावले.
 
आदेशानुसार चेलारामला राजाच्या खोलीसमोर ठेवण्यात आले . महल मधील मऊ गादी, चविष्ट जेवण, राजसी थाटमाट बघून चेलाराम खुश झाला. तो पोट भरून जेवला आणि लवकर झोपुन गेला . दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला लवकर जाग आली. पण तो गादिवरच बसून राहिला, तेवढयाच राजा कॄष्णदेवराय त्याला पाहण्यासाठी खोलीत आले. त्यांनी चेलरामला पाहिले व रोजच्या कामासाठी निघून गेले. योगायोगाने त्या दिवशी राजाला सभेला लवकर जावे लागले. या करिता त्यांनी सकाळी काहीच खाल्ले नाही. सभा बैठक खूप वेळेपर्यंत चालली सकाळची संध्याकाळ झाली. पण राजाला जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. संध्याकाळी जेव्हा राजा जेवायला बसले तेव्हा त्यांच्या जेवणात माशी पडली राजाला खूप राग आला. आणि त्यांनी जेवण न करण्याचा निर्णय घेतला.  भूक आणि थकव्यामुळे राजाची वाईट अवस्था झाली. राजाला राग येऊन त्याने याचा सर्व दोष चेलरामला दिला. राजाने स्वीकार केले की, चेलाराम है दुर्दैवी व्यक्ती आहे. व राजाने चेलारामला प्राणदंड शिक्षा सुनवली. तसेच म्हणाले की अश्या व्यक्तीला राज्यात जगण्याचा अधिकार नाही. 
 
जेव्हा ही गोष्ट चेलरामला समजली तेव्हा तो पळत पळत तेनालीरामकडे आला. त्याला माहीत होते की राजा पासून फक्त तेनालीरामच त्याला वाचवू शकतो. त्याने सर्व घडलेला प्रकार तेनालीरामला सांगितला. तेनालीरामने त्याला आश्वासन दिले की घाबरू नकोस मी सांगतो तसेच कर. दुसऱ्या दिवशी फाशी देण्यासाठी चेलारामला आणण्यात आले. त्याला विचारले गेले त्याची शेवटची इच्छा काय आहे. चेलाराम म्हणाला की राजसोबत पूर्ण सभेत काहीतरी बोलायचे आहे. राजदरबारत सभा बोलवण्यात आली. राजा चेलारामला म्हणाला बोल तुझी शेवटची इच्छा काय? चेलाराम म्हणाला की मी जर दुर्दैवी आहे की माझा चेहरा पाहिल्यावर दिवसभर त्या व्यक्तीला जेवण मिळत नाही तर महाराज तुम्ही पण दुर्दैवी आहात हे ऐकून राजाला राग आला, राजा चिडून म्हणाला तुझी एवढी हिम्मत की तू मला दुर्दैवी म्हणतोस, मी कसा दुर्दैवी सांग? मग चेलाराम म्हणाला की कोणी सकाळी तुमचा चेहरा पाहिला तर त्याला प्राणदंड मिळतो. हे ऐकून राजाच्या राग शांत झाला राजाला समजले की चेलाराम निर्दोष आहे. राजाने चेलरामला मुक्त करण्याचे आदेश दिले मग राजाने त्याला विचारले असे कोणी तुला बोलायला लावले तेव्हा चेलाराम म्हणाला की, " तेनालीराम शिवाय दूसरे कोण मला वाचवू शकतो म्हणून मी तेनालीरामकड़े जावून प्राणांची दया मागितली. हे ऐकून महाराज प्रसन्न झालेत त्यांनी तेनालीरामची खूप प्रशंसा केली. मग तेनालीरामला राजाने रत्नजडित सोन्याचा हार आणि भेटस्वरुप दिला. 
 
तात्पर्य : सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणाच्याही बोलण्यात येऊ नये, विचारपूर्वक विश्वास ठेवणे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती