मुर्ख गाढव

बुधवार, 24 जानेवारी 2024 (12:04 IST)
खूप वर्षपूर्वीची गोष्ट आहे एक शहरात एक धोबी राहत होता. तो खूप स्वार्थी आणि निर्दयी होता. त्याच्या जवळ एक गाढाव होते जे त्याच्या वस्तु एकजागेवरून दुसर्याजागेवर न्यायचे. गाढव दिवसरात्र मेहनत करायचे. पण धोबी त्याला पोटभर जेवण द्यायचा नाही यामुळे ते गाढव अशक्त व्हायला लागले होते. 
 
आता धोबिला चिंता व्हायला लागली पण त्याला गाढवच्या खुराकवर पैसे खर्च करायचे नव्हते. त्याने गढवाला जेवण खावु घालायचा नविन उपाय शोधला. तो कुठूनतरी चित्त्याची कातडी घेवून आला आणि त्या कातडीला त्याने गढवाच्या अंगावर लेपटले व गढवाला त्याने शेजारयांच्या शेतात चरायला सोडून दिले.
 
शेताच्या मलकांना वाटले की खरोखरचा चित्ता शेतात घुसला आहे.ते भीतीने घाबरून शेतातून पळून गेलेत. आता तर गाढव प्रत्येक रात्र चित्त्याची कातडी अंगावर पांघरून शेतात घुसायचा आणि पोटभर पिक खायचा. 
 
लवकरच तो गुटगुटित आणि धष्टपुष्ट बनला. धोबी खुश होता कारण त्याला गढवावर पैसे खर्च करायची गरज पडत नव्हती. पण शेताचे मालक चितंतित होते. गाढव प्रत्येक रात्री त्यांचे पिक नष्ट करायचे. 
 
एक शेताच्या मालकाने ठरवले की तो चित्त्याला मारेल अस. तो हलका भूर्या रंगाचे काम्बळ अंगावर ओढून शेताच्या कोपऱ्याला लपून बसला. आणि हातात धनुष्यबाण घेवून बसला त्यादिवशी जेव्हा गाढव शेतात आले तर त्याने कंबल मध्ये लिपटून बसलेल्या माणसाला तो गाढव समजला. आपल्या साथीला पाहून त्याला खूप आनंद झाला. ते जोरजोरात केकायला लागले.
 
त्याचा आवाज ऐकून शेताचा मलकाने ओळखले की ते गाढव आहे. त्याची सर्व भीती निघून गेली. त्याने धनुष्याने बाण चालवला आणि त्यात  गाढव जखमी झाले आणि तडफडून मरून गेले. 
 
तात्पर्य  
गडबड करू नका काही पण बोलण्याआधी आणि करण्याआधी विचार करणे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती