तेनालीरामने सैनिकाला सांगितले की मला राजाला भेटायचे आहे कारण त्यांनी ऐकले आहे की राजा कृष्णदेवराय खूप दयाळू आणि उदार आहे. तसेच तेनालीरामने सांगितले ते फार लांबून महाराजांना भेटायला आले असल्याने राजा त्याला नक्कीच भेट देईल. हे ऐकून सैनिकाने तेनालीरामला विचारले की जर राजाकडून भेट मिळाली तर काय मिळेल? तेनालीने सैनिकाला वचन दिले की राजा त्याला जे काही देईल ते सैनिकासोबतवाटून घेईल. हे ऐकून सैनिकाने त्यांना राजवाड्यात जाण्याची परवानगी दिली.
तेनालीराम राजाच्या दरबारात गेले. तेव्हा त्यांनी राजाला पाहिले. तसेच त्यांना पाहून महाराज रागावले आणि त्यांनी सैनिकांना सांगून तेनालीराम यांना पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला. तेनालीरामने आपले हात जोडले आणि राजाला सांगितले की ज्या सैनिकांनी त्याला राजाच्या दरबारात प्रवेश करण्यास मदत केली होती त्यांना ही भेटवस्तू वाटून घ्यायची आहे. हे ऐकून राजाने दोन्ही सैनिकांना प्रत्येकी पन्नास फटके मारण्याचा आदेश दिला.