कहाणी : निर्बुद्ध अनुकरण

शनिवार, 9 मार्च 2024 (21:30 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका देशामध्ये कोरडा दुष्काळ पडला होता. सर्व लोकांची शेतातील पिक हे वाळून नष्ट झाले होते. लोक अन्न-पाण्यासाठी तळमळत होते. अश्या कठिन परिस्थितीमध्ये पशु पक्षांना देखील चारा-पाणी मिळत नव्हता. जेव्हा कावळ्यांना अन्न पाणी मिळत नाही तेव्हा ते अन्न-पाण्याच्या करिता जंगल शोधतात. एकदा कावळा आणि कावळी एका जंगलात पोहचले. ते एका झाडावर बसलेत आणि तिथेच त्यांनी आपले घरटे बांधलेत. त्या झाडाखाली एक तलाव होता. त्या तलावाच्या पाण्यात एक कावळा राहत होता तो दिवसभर त्या तलावातील मासे खायचा आहे पोट भरले की तलवाच्या पाण्यात खेळायचा. 
 
झाडाच्या फांदीवर बसलेला कावळा तलवातील त्या कावळ्याला बघायचा तेव्हा त्यालापण त्याच्या सारखे खेळावे असे वाटायचे. त्याने विचार केला की जर त्याने पाण्यातल्या कावळ्यासोबत मैत्री केली तर त्याला देखील दिवसभर मासे खायला मिळतील आणि त्याचे देखील दिवस चांगले जातील. तो तलवाजवळ गेला आणि गोड भाषेत त्या कावळ्याशी बोलू लागला. तो म्हणाला- "ऐकना मित्रा, तू खूप शक्तिवान आहेस पटकन मासे पकडून घेतोस माला पण तू हे शिकवू शकतोस का?" हे ऐकल्यावर पाण्यातला कावळा म्हणाला की, तू हे शिकून काय करशील, जेव्हा पण तुला भूक लागेल तर मला सांग मी तुला पाण्यातून मासे पकडून आणून देईल आणि तू ते खावून घेत जा. त्या दिवसानंतर जेव्हा पण कावळ्याला भूक लागायची तो पाण्यातील कावळ्याजवळ जायचा मग पाण्यातील कावळा त्याला पुष्कळ मासे खायला दयायचा. 
 
एक दिवस त्या कावळ्याने विचार केला की बस पाण्यात जाउन मासेच तर पकडायचे आहे. हे काम तो स्वत:देखील करू शकतो. शेवटी किती दिवस पाण्यातील कावळ्याचे उपकार घ्यावे असे तो स्वतःशी बोलला. त्याने ठरवले की मी तलावात जाईल आणि स्वत:साठी मासे पकडेल. जेव्हा तो तलवातल्या पाण्यात जाऊ लागला. तेव्हा पाण्यातील कावळा त्याला म्हणाला की- "मित्र तू असे करू नकोस तुला पाण्यात मासे पकडता येत नाही. त्यामुळे पाण्यात जाणे तुझ्यासाठी सुरक्षित नाही. हे ऐकून झाडावरील कावळा अहंकाराने बोलला की- "तू हे तुला असलेल्या अभिमानामुळे बोलत आहेस मी पण तुझ्यासारख पाण्यात जावून मासे पकडू शकतो आणि मी आज हे सिद्ध करेल." 
 
एवढे बोलून झाडावरील कावळ्याने पाण्यात ऊडी लावली. आता तलावाच्या पाण्यात दलदल जमलेले होते. ज्यामध्ये तो अडकून गेला. त्या कावळ्याला माहित नव्हते बाहेर कसे निघावे. त्याने दलदलित आपली चोच मारून त्यात छिद्र करण्याचा प्रयत्न केला. असे करण्यासाठी त्याने आपली चोच त्या दलदलित घातली तर चोच देखील त्या दलदलित फसून गेली खूप प्रयत्न केले पण तो बाहेर येऊ शकला नाही. मग काही वेळानंतर पाण्यात बुडल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. नंतर कावळ्याच्या शोधात कावळी तलवाजवळ पोहचली. तिथे कावळीने पाण्यातील कावळ्याला आपल्या कावळ्याबद्द्ल विचारले. मग पाण्यातील कावळ्याने सर्व घडलेली कहाणी तिला सांगितली. कावळा म्हणाला की-"माझे अनुकरण करायला गेला आणि प्राण गमावून बसला."
 
तात्पर्य- एखाद्यासारखे बनण्यासाठी देखील मेहनत करावी लागते. तसेच अहंकार माणसाचा घात करत असतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती