बोधकथा : दोन हंसांची कहाणी

गुरूवार, 21 मार्च 2024 (21:30 IST)
खूप जूनी गोष्ट आहे. हिमालयात मानस नावाचे प्रसिद्ध सरोवर होते. तिथे अनेक पशु-पक्ष्यांसोबत एक हंसांचा कळप देखील रहात होता. त्यातील दोन हंस खूप देखणे आणि सुंदर होते. तसेच ते एकसारखे दिसायचे. पण त्यापैक एक राजा होता आणि दूसरा सेनापती होता. राजाचे नाव होते धृतराष्ट्र आणि सेनापतीचे नाव सुमुखा होते. सरोवर हे ढगांच्या मध्ये स्वर्ग असल्यासारखे दिसायचे. त्यावेळी सरोवरात राहणार्या हंसांची प्रसिद्धी तिथे येणारे पर्यटकांमध्ये आणि देश-विदेशात पसरली होती. तेथील कौतुक अनेक कवींनी आपल्या कवितेत केले आहे. ज्यामुळे प्रभावित होऊन वराणसीच्या राजाला तेथील दृष्य पाहण्याची इच्छा निर्माण झाली. राजाने आपल्या राज्यात त्या सरोवरप्रमाणेच एक सरोवर बनवले आणि तिथे अनेक प्रकारचे सुंदर फुलांचे रोप तसेच चविष्ट फळांची झाडे लावलीत व वेगवेगळ्या पशु-पक्षींची काळजी घेण्याचे आदेश दिलेत. वाराणसीचे हे सरोवर स्वर्गसारखे सुंदर होते. पण, राजाच्या मनात अजुन पण त्या दोन हंसांना पाहण्याची इच्छा होती, जे मानस सरोवरात राहत होते. 
 
एक दिवस मानस सरोवरमधील इतर हंसांनी राजाच्या समोर वाराणसी येथील सरोवर पहायला जाण्याची इच्छा प्रकट केली. तो हे जाणून होता की, हंस तिथे गेलेत तर राजा त्यांना पकडून घेईल. त्याने सर्व हंसांना वाराणसीला जायला नाही सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. मग राजा, सेनापती सोबत सर्व हंस वाराणसीला जाण्यासाठी निघाले. जसे त्या हंसांचा कळप त्या सरोवरात पोहचला तर इतर हंसांना सोडून ते प्रसिद्ध दोन हंस सुंदर दिसत होते. सोन्याप्रमाणे चमकणारी चोच, सोन्याप्रमाणे दिसणारे त्यांचे पाय आणि ढगांपेक्षा पांढरेशुभ्र त्यांचे पंख प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करत होते. हंसांच्या पोहचण्याची बातमी राजाला दिली गेली. त्याने हंसांना पकडण्याची युक्ती शोधली. मग एका रात्री जेव्हा सगळे झोपलेत तर त्या हंसांना पकडण्यासाठी जाळे टाकले गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हंसांचा राजा जागी झाला आणि फिरण्यासाठी निघाला, तर तो जाळ्यामध्ये अडकला. त्याने लगेच मोठया आवाजात सर्व हंसांना हाक देऊन तेथून उडून जावून स्वताचा जिव वाचवा असा आदेश दिला. इतर सर्व हंस उडून गेलेत. पण त्या हंसाचा सेनापती सुमुखा आपल्या राजाचा जीव वाचवण्यासाठी तिथेच थांबला.  त्यावेळेस त्या हंसांना पकडण्यासाठी राजाचे सैनिक तिथे आलेत त्यांनी पाहिले की हंसांचा राजा जाळ्यामध्ये अडकला आहे. आणि सेनापती राजाला वाचवण्यासाठी तिथे उभा आहे. हंसची स्वामी भक्ती पाहून सैनिक प्रभावित झालेत आणि त्यांनी त्या हंसाला सोडून दिले. हंसांचा राजा समजूतदार सोबत दूरदर्शी पण होता. त्याने विचार केला की जर राजाला समजले की सैनिकांनी त्याला सोडून दिले तर राजा सैनिकांना नक्कीच प्राणदंड देईल. मग हंस म्हणाला की, तुम्ही मला तुमच्या राजाजवळ घेऊन चला. मग सैनिक त्या हंसाला घेऊन राजदरबारात गेले. दोन्ही हंस सैनिकांच्या खांदयावर बसले होते.हंसांना सैनिकांच्या खांदयावर बसलेले पाहून प्रत्येक व्यक्ती विचारात पडला जेव्हा राजाने या गोष्टीचे रहस्य विचारले? तर सैनिकाने घडलेली सर्व गोष्ट राजाला सांगितली. सैनिकाची सर्व गोष्ट ऐकून राजासोबत सर्व दरबार त्या हंसाचे साहस आणि सेनापतीची स्वामीभक्ती पाहून आश्चर्चकित झाले आणि सर्वांच्या मनात त्या हंसांनबद्द्ल प्रेम निर्माण झाले. राजाने सैनिकाला माफ केले आणि त्या हंसांना आदराने आजुन काही दिवस तिथे थांबण्याची विनंती केली. हंसांने राजाची विनंती मान्य केली आणि काही दिवस तिथेच थांबून मानस सरोवरकडे परत निघून गेलेत.  
तात्पर्य- कुठल्याही परिस्थितीत आपल्या माणसांची साथ सोडू नये.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती