पंचतंत्र कहाणी : कावळा आणि साप

सोमवार, 29 जुलै 2024 (13:13 IST)
एका जंगलात एक जुने वडाचे झाड होते. त्या झाडावर एक कावळा आणि कावळीचे जोडपे घर करून राहत होते. त्याच झाडाच्या मुळाशी एक दुष्ट साप येऊन राहायला लागला. प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यावर कावळीण अंडे द्यायची आणि दुष्ट साप ते पूर्ण अंडे खाऊन टाकायचा.
 
एकदा कावळा आणि कावळीण चार खाऊन घरे परतत होते तेव्हा त्यांनी त्या दुष्ट सापाला घरट्यात अंडे खातांना पहिले. अंडे खाऊन कावळा निघून गेला व नंतर दुःखी झालेल्या कवळिणीला कावळ्याने आधार दिला व समजावले की, 'प्रिये, खचू नकोस हिंमत ठेव. हातात आपल्याला शत्रूचा पत्ता काळाला आहे. आपण काहीतरी उपाय करू.
 
तसेच कावळा म्हणाला की, संकट खूप मोठं आहे तू काळजी करू नकोस आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. पळून जाणे हे उचित नाही.संकटात मित्रच कामास येतात.आपल्याला मित्र लांडगा यांच्याकडून मदत घ्यायला हवी. 
 
ते दोघी लागलीच लांडगा जवळ आले. लांडग्याने मित्रांची दुःखद कहाणी ऐकली. त्याने कावळ्याचे अश्रू पुसले. व खूप विचारानंतर लांडग्याच्या मनात विचार आला. व तो कावळा आणि कावळीला म्हणाला की, तुम्ही ते वडाचे झाड सोडून जाऊ नका. मी तुम्हाला एक युक्ती सांगतो तेवढे तुम्ही करा. असे म्हणून लांडग्याने कावळ्याच्या कानात एक युक्ती सांगितली. व कावळा आणि कवळी तेथून निघून गेले.
 
दुसऱ्या दिवशी योजना साकार करायची होती.त्याचा जंगलामध्ये एक मोठे सरोवर होते. त्यामध्ये स्नान करण्यासाठी एक राजकुमारी रोज यायची. तिच्यासोबत तिच्या सखी आणि राजाचे सैनिक यायचे. यावेळेस देखील राजकुमारी आली व स्नान करण्यासाठी ती सरोवरात उतरली हे झाडावर बसलेल्या कावळ्याने पहिले. त्याची नजर राजकुमारीने किनाऱ्यावर काढून ठेवलेल्या आभूषणांवर पडली. त्यामध्ये राजकुमारीचा मोत्याचा हार ठेवलेला होता जो तिला अत्यंत प्रिय होता. कावळ्याने क्षणाचा विलंब न करता तो हार आपल्या चोचीमध्ये धरला. व तिथून उडाला. राजकुमारीने सैनिकांना आदेश दिले व माझा हार शोधून आणा असे सांगितले. सैनिक कावळा ज्या दिशेने गेला त्या दिशेला धावू लागले.  कावळ्याने मोठ्या हुशारीने तो हार सापाच्या घराजवळ टाकला. सैनिक तिथे पोहचले व त्यांनी पहिले की मोत्याच्या हाराजवळ साप वेटोळे करून बसला होता. तेव्हा सैनिकांनी त्या सापाला काठीने मारून ठार केले व हार घेऊन निघून गेले. हा सर्व प्रसंग झाडावर बसलेले कावळा आणि कवळी बघत होते. अश्याप्रकारे दुष्ट सापाचा अंत झाला व कावळा आणि कवळी सुखाने राहू लागले.
तात्पर्य : हुशार बलाढ्य शत्रूला देखील मात देता येऊ शकते, बुद्धीचा उपयोग करून संकटाचा सामना करता येतो. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती