Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. तो फार लोभी होता. त्याला कोणत्याच गोष्टीचे समाधान वाटायचे नाही. एकदा प्रखर उन्हाळा पडला. त्या दिवशी सिंहाला खूप भूक लागली. म्हणून तो इकडे तिकडे अन्न शोधू लागला. थोडा वेळ शोधल्यानंतर त्याला एक ससा सापडला, पण तो खूप लहान वाटल्याने तो खाण्याऐवजी त्याने तो सोडून दिला.
आता जेव्हा त्याला खायला काहीच मिळाले नाही तेव्हा त्याने पुन्हा त्या सशाला खाण्याचा विचार केला. पण जेव्हा तो त्याच ठिकाणी परत आला तेव्हा त्याला तिथे एकही ससा सापडला नाही कारण ससे तिथून निघून गेले होते. आता सिंह खूप दुःखी झाला आणि त्याला बरेच दिवस उपाशी राहावे लागले. आता त्याला समजले की, अति लोभामुळे आपल्याला भुकेले राहावे लागले.