कोणी दिला होता हनुमानाला आपल्या शक्ती विसरण्याचा शाप

सोमवार, 26 एप्रिल 2021 (13:41 IST)
आपल्या बालपणात हनुमान खोडकर होते, आणि कधीकधी जंगलात ध्यान करत असलेल्या साधूंना त्रास द्यायचे. हळू-हळू त्यांचा खोडकरपणा वाढू लागला. यामुळे जंगलातील ऋषी-मुनी आणि त्यांचे आई-वडील देखील काळजीत होते. एकदा त्यांच्या आई-वडीलांना साधू-संतांच्या आश्रात जाऊन विनंती केली की हनुमानाचा जन्म कठोर तपस्येनंतर झाला आहे, त्यामुळे यावर कृपा करा.
 
नंतर हनुमान लहान होते म्हणून ऋषींनी त्यांना हलका अभिशाप देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की जर हनुमानाला आपल्या शक्तींचा विसर पडला तर त्यांच्यावर नियंत्रण राहील. अंगिरा आणि भृगुवंशच्या मुनींनी हनुमानाला शाप दिला की आपण आपल्याला आपल्या बल आणि तेज याचा विसर पडेल आणि कुणी इतर याची आठवण दिली तरच आपण याचा वापर करु शकाल.
 
या शापामुळे हनुमान शांत सुकुमार सारखे वागू लागले होते. किशकिन्दा कांड आणि सुंदरकांड यात या शापाबद्दल उघडकीस आले जेव्हा जामबंत यांनी हनुमंतांना त्यांच्या शक्तींबद्दल स्मरण दिले आणि सीतेला शोधण्यासाठी प्रोत्साहित केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती