शाळा

सोमवार ते शनिवार असते शाळा
खरं सांगू अभ्यासाचा मज कंटाळा
डोळे असून मी बनतो काणा
गुरुजी म्हणतात मला दीडशहाणा

गुरुजींचे प्रश्न दोन अधिक दोन
उत्तर माझे पाच, गुरुजी पकडे माझे कान
रात्री मला काहीच लिहता वाचता येत नसे
एकाचे दोन, दोनाचे चार सारे काळेकुट्ट दिसे
शाळा असता माझे असेच होत राहिले
रविवारी मात्र माझे सगळे सुरळीत चाले.

वेबदुनिया वर वाचा