त्यांच्या पाठीवरील... भारंभार दप्तरांचे ओझे पाहून... मला सहज आठवण झाली.... देशातल्या गिर्यारोहकांची... हे तर चाललेत शाळेत.... उत्तम अशा ज्ञानार्जनासाठी... मग एवढे जड ओझे.... सांगा बर पाठीवर कशासाठी.. ? कुणाला तरी यांची... भविष्यात दया येईल... ? पाठीवरचे हे जड ओझे... सांगा कसे कमी होईल... ? हे तर देशाचे आधारस्तंभ.... यांची पुढे काय गत होईल... ?