खमंग थालीपीठ

एक होती मुलगी तिचे नाव कुमुद
ती आईला म्हणाली 'आई, आई, मला काही तरी दे.
मी भातुकली खेळते.' आईने विचारले, 'करंजी, लाडू देऊ का?'

नुकतीच दिवाळी झाली होती.
दिवाळीत खूप लाडू काऊन कुमुदला वीट आला होता
एकीकडे आई थालीपीठ करीत होती
थालीपिठाचा खमं
ND
वास सुटला होता
मग कुमुद आईला म्हणाली, 'आई, मला थालीपीठच दे.'
आईने एक थालीपिठाचा तुकडा दिला आणि
तिला म्हणाली, 'कुमुद, घरातच खेळ हो.
अंगणात जाऊ नको,'

पण कुमुदनेते ऐकले नाही.
ती हळूच अंगणात गेली.
तिने एका बाशीत थालीपीठ ठेवले
कावळेदादाला थालीपिठाचा खमंग वास आला
मग कावळेदादा अंगणात आले.
जवळच
ND
एक झाडावर बसले

मग 'काव, काव' करू लागले.
कुमुद खेळ मांडीत होती.
थालीपिठाकडे तिची पाठ झाली
हे पाहून कावळेदादांनी बशीवर झडप घातली.
थालीपीठ चोचीत घेतले
व परत झाडावर जाउन बसले
कुमुद मागे वळून पाहाते तो काय?
थालीपीठ नाही

आणि कावळेदादा झाडावर थालीपीठ खात आहेत!
आई दारात उभी राहून गंमत पाहात होती.
ते पाहून कुमुद खजिल झाली.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा