नोटेला दोरी- खोट्या नोटेला दोरा बांधा. वरच्या मजल्या किंवा खिडकीतून ती नोट खाली सोडा. रस्त्यावरुन जाणार्यांना नोट पडली आहे असे वाटेल आणि ते उचलायला येतील. तेव्हा त्यांनी उचलण्याची पोझिशन घेतली की नोट वर खेचून घ्या.
घरी मित्र मैत्रिणींना बोलवा. त्यांना एखाद्या खाद्य पदार्थं किंवा पेय पदार्थांत कारल्याचा रस मिसळून द्या.
घरात कोणाला फूल बनवायचे असेल तर सामानाची अदलाबदल करा. तुम्ही रोज लागणाऱ्या अशा वस्तूंची अदलाबदल करू शकता. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा गोंधळ उडेल.
क्रीम बिस्किटातील क्रीम काढून त्यात टूथपेस्ट भरा. तुमच्या भावडांना किंवा मित्र मैत्रिणींना खायला द्या.
फोनवर आवाज बदलनू गोष्टी करा.
तुम्ही अचानक तुमच्या मित्राला किंचाळून सांगा की त्याच्या डोक्यावर झुरळ आहे. खरे आहे असे मानून तो घाबरेल आणि सहजपणे एप्रिल फूल बनेल.