रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

शुक्रवार, 28 मार्च 2025 (13:17 IST)
पुण्यातील एका स्त्रीने फेसबुकवर दुधात चपाती चा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.तो फोटो पाहुन तिला comment मध्ये रेसिपी विचारतील असे तिने स्वप्नात सुद्धा विचार केला  नसेल.
 
काही बायकांचे मजेशीर ११,Comments
१,पहीली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे
२,दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा कि Grinder ने
३,तिसरी : एका चपातीला किती दुध घ्यायचे
४,चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का 
५,पाचवी : एका चपाती च्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची?
६,सहावी : दुध थंड घ्यायचे का गरम
७,सातवी : चपाती च्या ऐवजी भाकरी घेतली तर चालतील का
८,आठवी : चपाती ताजी हवी का शिळी। 
बेस्ट comment ने हद्दच केली।
९,बेस्ट : चपाती साठी गहु दळुन आणायचे.. का विकतचं पीठ चालेल।
१०,चपात्या घडीच्या हव्या का फुलके।
११,Winner:
 चपात्या बायकोने केलेल्या चालतील का रोजच्याप्रमाणे नवऱ्यानेच करायच्या.!
 
सोशल मीडिया-

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती