घोरणे दूर करण्यासाठीचे काही घरगुती उपाय

शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:09 IST)
रात्रीची झोप सर्वाना शांत लागावी असं वाटत असते. परंतु जर जवळ झोपणारा सतत घोरत असेल तर काय करावं असा व्यक्ती स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्यांना देखील झोपू देत नाही. असं म्हणतात की एखादा व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा तो गाढ झोपेत असतो. असं नाही हे विधान चुकीचे आहे. घोरणे हा एक प्रकारचा आजार आहे. व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा त्याच्या गळ्याचे स्नायू कमकुवत असतात. जबड्याचे स्नायू मध्ये ताण होतो आणि नाक अवरुद्ध होणे असे मुख्य कारणे आहेत. या साठी काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून या समस्यपासून सुटका मिळवू शकतो.
 
1 एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळा. दररोज झोपण्यापूर्वी हे प्यावे. असं केल्याने आपल्याला आराम मिळेल.  
 
2 एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद  मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यानं घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.  
 
3 एक कप उकळत्या पाण्यात दहा पुदिन्याची पानें घालून उकळवून घ्या आणि थंड करा. गाळून प्यावे. असं केल्यानं घोरण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती