स्वयंपाकघरातील या खजिन्याबद्दल माहिती आहे का, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होते मदत

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (18:02 IST)
आपल्या स्वयंपाकघरात बऱ्याच अश्या गोष्टी असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या गोष्टींचा वापर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज आम्ही आपल्याला अश्याच एका गोष्टी बद्दल सांगणार आहोत जी आरोग्यासाठी फायदेशीर असते. 
 
बऱ्याचदा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गोष्टींचे फायदे माहीत नसतात. आज या लेखाच्या माध्यमातून आपण त्या गोष्टीची माहिती करून घ्या जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या गोष्टीचा दररोज वापर केल्याने बरेच आजार टाळता येऊ शकतात. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमाने या गोष्टीचे सेवन करावं.
 
मोहरीचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर 
मोहरीचे तेल जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. मोहरीचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. 
 
वेदना कमी करण्यात मदत होते - 
मोहरीच्या तेलाचे सेवन केल्याने वेदनेपासून आराम मिळतो. शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी मोहरीच्या तेलाचा आपल्या आहारात समावेश करावा.
 
सांधेदुखीत फायदेशीर - 
मोहरीचे तेल वापरल्याने सांधेदुखीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी दररोज मोहरीच्या तेलाने मालिश करावी. नियमाने असे केल्यास सांधे दुखण्यापासून आराम मिळतो.
 
भूक वाढविण्यात मदत होते - 
बऱ्याच लोकांना भूक न लागण्याची समस्या असते. भूक न लागण्याच्या त्रासामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागतो. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी आपल्या आहारात मोहरीच्या तेलाला समाविष्ट करावं. मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते.
 
दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
मोहरीचं तेल दम्याचा रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं. मोहरीच्या तेलात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आढळतं जे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं.
 
वजन कमी करण्यात उपयुक्त -
मोहरीचं तेल वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येत. मोहरीच्या तेलात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळतात जे मेटाबालिज्म (चयापचय) वाढविण्यास मदत करतात. वजन कमी करणाऱ्यांना आपल्या आहारात मोहरीच्या तेलाला समाविष्ट करावं.
 
दात दुखीचा त्रास दूर होतो -
मोहरीच्या तेलाचे वापर केल्याने दात दुखण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. त्यासाठी मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हिरड्यांवर चोळावे. या मिश्रणाची मालिश केल्याने दातदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते.
 
प्रतिकारक शक्ती बळकट होते -
मोहरीचं तेल आरोग्यासाठी फायदेशीर असतं. नियमाने मोहरीचे तेल वापरल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते. दररोज मोहरीच्या तेलाचं सेवन करावं.
 
त्वचेला चकाकी येते -
मोहरीचं तेल त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं. त्वचेवर मोहरीचं तेल लावल्याने त्वचेची आद्रता कायम राहते आणि त्वचा तजेल होते. आपण मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश देखील करू शकता
 
टीप : हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी दिला जात आहे. कोणतेही प्रयोग करण्याच्या पूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती