हल्ली हात स्वच्छ करण्यासाठी सतत सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण करोना संक्रमणापासून बचावासाठी हा एकमेव रामबाण उपाय आहे. पण मोबाईलला Disinfect करणे देखील तेवढेच गरजेचे आहे कारण वर्तमान काळात सतत हातात मोबाईल असणे आणि त्यानंतर कळत-नकळत ते हात आपल्या चेहरा किंवा डोळ्यांना स्पर्श होणे आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतं.
मोबाइल स्वच्छ करण्यासाठी आपल्या या सामुग्रीची गरज भासेल-
सॉफ्ट कपडा, जसा की आपण चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरतो.
सर्वात आधी आपला मोबाइल स्वीच ऑफ करावा. नंतर कव्हर काढावं.
नरम कपड्याला आइसोप्रोफाइल अल्कोहलने जरा ओलसर करावं. अधिक किंवा गच्च ओलं करू नये याची काळजी घ्या.
अल्कोहोल बेस्ड वाइप्स वापरून देखील मोबाइल सॅनिटाईज करता येऊ शकतो.
मोबाइल सुकल्यानंतर ऑन करावा नाहीतर फोन खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.